*जोपर्यंत मनपाचे थकीत १९.१८ कोटी रूपये वसुल केल्या जात नाही तोपर्यंत अमरावतीकरांचे वीजेचे कनेक्शन कापु नये.* ‘वंचित’ चा महावितरण ला इशारा

0
1102
Google search engine
Google search engine

आज दिनांक 30 जुन रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महावितरण ला तीव्र इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत मनपाचे थकीत १९.१८ कोटी रूपये वसुल केल्या जात नाही तोपर्यंत अमरावतीकरांचे वीजेचे कनेक्शन कापु नये. निवेदनात म्हटले आहे की, अमरावती शहरातील नागरिक विविध पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरीता विविध प्रकारचा टैक्स भरते. या पैसातुनच नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात, परंतु जिल्हा परिषद असो की अमरावती महानगरपालिका आर्थिक घोटाळ्यांचे केंद्र स्थान बनले आहे. त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. आज मनपा कडे महावितरण चे अंदाजे 19.18 कोटी रूपये थकीत आहेत. याची आधी वसुली आपण करायला पाहिजे.

नंतर ग्राहकांची!
मागील दोन वर्षांपासुन कोवीड संक्रमण व लाॅकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, शहरातील आटोरिक्षाचालक, कामगार, गवंडी कामगार व सामान्य नागरिक यांची फार मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली आहे. कुठल्याही स्वरूपाची राज्य सरकार व केंद्र सरकारने थेट काहीही आर्थिक पेकेज गरीबांना दिलेले नाही. त्यामुळे गरीबांवर उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला. उलट कर्जबाजारी उसनवार घेवून कसे तरी आपले जीवन जगत असल्याचे दिसते. त्यातच महावितरण ने वीज बील भरण्याचा तगादा लावला आहे.विद्युत वितरणच्या कर्मचा-यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता अमरावती शहरातील अनेक ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहेत. महावितरण कडुन ऐकीकडे करोडो रुपयाचे थकीत बील असुनही वसुली केली जात नाही आणि दुसरीकडे ग्राहकांचे थेट वीज कनेक्शनच कापणे सुरु आहे. महावितरण कंपनी ची ही हुकुमशाही- दुटप्पी धोरण कितपत योग्य आहे? म्हणुन शहरातील सर्व शासकीय कार्यालयाचे थकीत वीजेचे बील वसुल केल्या जात नाही तोपर्यंत सामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन कापू नये, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडेल. निवेदन देते वेळी वंचित चे दीपक मेटांगे, सुरेश तायडे, सतीश मेश्राम, रूपेश कुतरमारे, संदीप भालाधरे, किरण गुडधे, यश सिरसाठ शीतल गाजभिये, वर्षा आकोड़े, सचिन मोटघरे, रितेश बोरकर, संघर्ष फुले सनी गोंडाने, मिलिंद राऊत, सचिन बोरकर, दिपक चावळा, निरंजन कळंबे आदी. अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.