*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आता ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ कार्यक्रम*

0
738
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. ०१ : सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शालेय कामकाज सुरु झाले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात शाळेत उपस्थिती नाही. परंतू विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी नियोजनपुर्वक कार्यवाही सर्व शाळांनी करणे आवश्यक आहे. याकरीता ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ या कार्यक्रमांतर्गत मागील सत्रात सुरु केलेले विविध उपक्रम यावर्षी सुद्धा सुरु ठेवण्यात यावेत. त्याबाबतचे योग्य ते नियोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी करावे, असे आवाहन शिक्षण विभागाव्दारे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ॲन्ड्रॉईड मोबाईल सुविधा उपलब्ध असलेली व नसलेली विद्यार्थी संख्या निश्चित करावी. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यासाठी दैनंदिन ऑनलाईन तासिका शिक्षकांनी घेण्याचे नियोजन करुन प्रत्यक्ष तासिका घेण्यात याव्यात. व्हॉट्स ॲप, दिक्षा ॲप, दुरदर्शन, रेडिओवर प्रसारित होणारे शैक्षणिक कार्यक्रम, अभ्यासमाला याद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहील यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ऑनलाईन शिक्षणाबाबत शासनाने यापुर्वी निर्गमित केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. मागील सत्रातील शिक्षक मित्र उपक्रम या सत्रात सुद्धा सुरु ठेवण्यात यावा. या संदर्भात ऑफलाईन शिक्षणासाठी गावातील उच्च शिक्षित व्यक्ती, पालक यांना प्रवृत्त करुन शिक्षक मित्र म्हणून त्यांचेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांचे गावातील योग्य ठिकाणी कोविड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन शिक्षण सुरु ठेवण्यात यावे. स्वत: शिक्षक यांनी सुद्धा शिक्षक मित्र म्हणून काम करावे.

या व्यतिरिक्त शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवता येईल. यादृष्टीने सर्व शिक्षक व सर्व पर्यवेक्षकांनी नियोजन करुन अंमलबजावणी करावी. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पर्यवेक्षकिय यंत्रणेने योग्य ते संनियत्रण करावे व शिक्षक मित्रांची संख्या या कार्यालयास सादर करावी, असे जिल्हा परिषद अमरावतीचे शिक्षणाधिकारी प्राथमिक ई.झेड. खान यांनी कळविले आहे.

0000