विसावा वृद्धाश्रमात माणुसकीचे दर्शन निराधार दामुजींच्या अंत्यविधीला माणुसकीचा गोतावळा ; शेवटच्या इच्छेनुसार वृद्धाश्रम परीसरातच दाहसंस्कार

0
497
Google search engine
Google search engine

 

अचलपुर – सापन बहुद्देशीय संस्था सावळी दातुरा व्दारा संचालित अचलपुर येथील विसावा वृद्धाश्रमात दामुजी परतेती यांचे वृद्धपकाळाने दुखद निधन झाले. तालुक्यातील तोंडगांव येथील रहिवासी असलेल्या दामुजींना त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार विसावा वृद्धाश्रम परीसरातच दाहअग्णी देत शेवटचा निरोप देण्यात आला. निराधार असलेल्या दामुजींच्या अंत्यविधीला मात्र अनेक युवक जमल्याने माणुसकीचा गोतावळा निर्माण झाला होता.

निराधार असलेले दामुजी परतेती यांची काळजी घेणारा कोणी नसल्याने त्यांना परीचयातील व्यक्तीने विसावा वृद्धाश्रम अचलपुर येथे तिन वर्षापुर्वी दाखल केले होते. जानेवारी 2021 मध्ये त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांचे अर्धे शरीर निकामे झाले होते. त्यांच्यावर रुग्णालय व आर्युवेदीक उपचार करण्यात आले. गेल्या सहा महिन्न्यांपासुन त्यांची घरच्या सारखी सेवा विसावा वृद्धाश्रमात सुरु होती. शनिवार दि. 3 जुलौ 2021 रोजी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या इच्छे नुसार त्यांच्यावर विसावा वृद्धाश्रम परीसरात दाहसंस्कार करण्यात आला. योगायोगाने आज विसावा वृद्धाश्रमात सामाजीक कार्यकर्ते क्षितीज रोहणकर यांच्या वाढदिवसा निमीत्य कार्यक्रम होता. क्षितीज रोहणकर, अक्षय माकोडे व मित्रमंडळीने कोणतेही नाते नसतांना केवळ माणुसकीच्या नात्याने दामुजी परतेती यांचा अंत्यविधीमध्ये हिरीरीने सहभाग दर्शविला. यावेळी विसावा वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव अडव.भाष्कर कौतिक्कर, सचिन वानखडे, जानराव कौतिक्कर, महेंद्र वानखडे, प्रविण मोहने,रामचंद्र तंतरपाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अक्षय माकोडे, क्षितिज रोहनकर, राम घिये प्रतीक हरणे, धीरज गायगोले, शुभम शेंडे, आकाश खारोडे, राम रोहनकर, तुषार खारोडे, ऋषी सावलकर सुमित रोहनकर, पणल रोहनकर, ऋषीकेश रोहनकर , गोलू खांडेकर, शिवा जांभुळकर, शंतनु घोम आदींची विशेष उपस्थिती होती