राजुरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार निधी अंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध !   आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न .

0
465
Google search engine
Google search engine
राजुरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार निधी अंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध !
 आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न .
वरुड तालुका प्रतिनिधी /
 मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत वरुड मोर्शी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी मोर्शी मतदारसंघातील राजुरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रा करीता आमदार निधी अंतर्गत एक अद्ययावत रुग्णवाहिका आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते सर्व सेवा सुविधा युक्त रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य राजुरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हस्तांतरित करण्यात आली.
  याप्रसंगी आमदार देवेंद्र भुयार यांनी कोरोना विरोधातील लढाईत आपला सहभाग देत असताना आवश्यक रुग्णालयीन सुविधांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी आमदार रुग्णवाहिकेकरिता निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले. माझ्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल झाली असून नागरिकांना वेळेत उपचार व्हावेत याकरिता या रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
 सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीमध्ये ज्या सुविधांची गरज आहे त्यामध्ये रुग्णवाहिका ही महत्त्वाची गरज असून आमदार देवेंद्र भुयार यांनी ऑक्सिजन सुविधा व मॉनिटर्स सुसज्ज अशा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वरुड मोर्शी तालुक्याला योग्य सहकार्य केल्याबद्दल मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांनी आभार मानले.
या रुग्णवाहिकेचा कोविड व्यवस्थापनात व ईतर रुग्णांसाठी चांगला उपयोग होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.   राजुरा बाजार येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू कोहळे , जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी पं स सभापती राजाभाऊ कुकडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभा शेळके, डॉ आकाश राऊत, डॉ. प्रगती नंदेश्वर, पंचायत समिती सदस्य  सिंधुताई कर्नाके,सरपंच निलेश धुर्वे, उपसरपंच प्रशांत भाऊ बहुरूपी, ग्राम पंचायत सदस्य किशोर गोमकाळे, रजनीताई भोंडे, जयाताई निकम मनोहरराव आंडे, रविंद्रभाऊ जोगेकर,  प्रशांत शिरभाते, विद्याताई कुयटे, प्रतिभाताई दाभाडे, कल्पनाताई डाफे, सविताताई बहुरूपी, दिलीपराव भोंडे, बाबारावजी बहुरूपी तालुका अध्यक्ष काँग्रेस,ज्ञानेश्वरराव यावले,गणेश चौधरी, ऋषिकेश राऊत तालूका अध्यक्ष शेतकरी स्वाभिमानी संघटना,मंगेश भाऊ तट्टे स्वाभिमानी शेतकरी संघटना, कृष्णा धुर्वे स्वाभिमानी शेतकरी संघटना,बाबारावजी मांगूळकर,सुधाकरराव डाफे,डॉ. विजयभाऊ बहुरूपी, भानुदासजी भोंडे, आत्माराम पखाले, अरुणपंत दाभाडे, नामदेवराव काठाणे,शेषरावजी निमजे, प्रदिप बहुरूपी, शिवहरी ढोले, शिवहरी गोमकाळे, सतीशभाऊ बहुरूपी, रामचंद्र बहुरूपी, नितीन बहुरूपी, निलेश गोमकाळे, बबलू श्रीराव, सुरेंद्र काकडे, विकास भोंडे, निखिल भोंडे, किशोर भाऊ हेलोडे, सागर राऊत यांच्यासह राजुराबाजार येथील इतर नागरिक उपस्थित होते.