गोरेगाव येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ५१ लक्ष ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर ! 

0
688
Google search engine
Google search engine
गोरेगाव येथील पाणी पुरवठा योजनेकरिता ५१ लक्ष ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर !
गोरेगावची तहान भागणार ; पाणी पुरवठा योजनेला मंजुरात !
गोरेगाव येथील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !
वरुड तालुका प्रतिनिधी :
           वरुड मोर्शी तालुक्यातील २८ गावांचा जल जीवन मिशन कार्यक्रमामध्ये समावेश करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री अविनाश बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये वरुड तालुल्यातील गोरेगाव, सावंगी, बेसखेडा, बाभूळखेडा, इसंबरी, बहादा, कुमुंदरा, मांगोना, वाठोडा, बेलोरा, टेंभनी, गव्हाणकुंड, पळसोना वडाळा, मोर्शी तालुक्यातील दापोरी, बेलोना, उमरखेड, लाडकी, निंभी, पिंपळखुता लहान, पिंपळखुटा मोठा, खानापूर, इणापूर, आसोना, मनीमपूर, पार्डी, हिवरखेड, येरला, या गावांना जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री अविनाश बनसोडे यांनी जल जीवन मिशनकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे तसेच मोर्शी वरुड तालुक्यातील गावातील योजनांचे प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती यांना देण्यात आले आहे.
वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळवण्यास आमदार देवेंद्र भुयार यांना यश आले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून पाणी पुरवठा योजनेच्या या कामाला ५१ लक्ष ३६ हजार रुपयांचा प्रशासकीय मान्यता आदेश ९ ऑगस्ट रोजी मिळाल्यामुळे आता लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून गोरेगावची तहान भागणार आहे.
साधारण २ हजार २९३ लोकसंख्या असणाऱ्या या गावाचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता. उन्हाळ्यात तर नेहमी पिण्याचे पाणी ग्रामस्थांना वेळेवर मिळत नव्हते. त्यावेळी नागरिकांची तहान भागविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी गोरेगाव येथील पाणी पुरवठा योजनेला निधी मिळवून ही योजना कार्यान्वित करू असा गोरेगाव वासीयांना दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे. या योजनेमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे गोरेगाव येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
गोरेगाव येथे नेहमी पाण्याची टंचाई भासत असतांना महिलांकडून पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत होती. पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री अविनाश बनसोडे व संबंधित सर्वच मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आणि योजनेस मंजुरी मिळाली. त्यामुळे ‘मी फक्त बोलतच नाही तर प्रत्यक्षात करून दाखवतो’ असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.