दि रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल, नागपूर येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा

0
722
Google search engine
Google search engine

नागपूर :-

दि रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या अध्यक्षा ज्योती अय्यर तसेच सचिव श्री.सुरज अय्यर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय व्यवस्थापक श्री वैभव काळे , उपविभागीय व्यवस्थापक श्री राजकिशोर रंजीत, प्रबंधक श्री विजय मेश्राम नागपूर विभाग बँक ऑफ महाराष्ट्र तसेच शाळेचे विश्वस्त डॉ. नंदलाल चौधरी व शाळेचे प्राचार्य श्री. तुषार चव्हाण सर उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या शिक्षिका सरस्वती परिहार आणि शीला दुबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
श्री वैभव काळे यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य श्री तुषार चव्हाण यांनी रोपटे देऊन केले .श्री राजकिशोर रणजीत यांचे स्वागत डॉक्टर नंदलाल चौधरी यांनी केले तर विजय मेश्राम यांचे स्वागत मंजिरी जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्योती अय्यर यांचे स्वागत शाळेचा विद्यार्थी सागर परतेकी याने केले. त्यानंतर शिक्षक राहुल मानेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गीत सादर केले तसेच शाळेच्या शिक्षिका सुनिता गायकवाड यांनी स्वरचित हिंदी काव्य गायन केले. नंतर डॉ.नंदलाल चौधरी यांनी आपल्या अत्यंत प्रेरणादायी भाषणात राष्ट्रभाषा म्हणजे राष्ट्रीय अस्मिता होय ,भाषा संस्कृती चे वहन करते आणि हिंदी भाषाच भारताला विश्वगुरू बनवू शकते. असे मत व्यक्त केले. “मेरा मान है हिंदी “‘मेरा अभिमान है हिंदी’ “हिंदुस्तान की सच्ची पहचान है हिंदी “या स्वरचित काव्यपंक्तींनी भाषणाचा त्यांनी शेवट केला. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी कथा, भाषण या द्वारे आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कबिराचे दोहे गाऊन दाखवले शाळेच्या अध्यक्षा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती अय्यर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले.
मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सगळ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेतील दीक्षांत खोब्रागडे, जीविका वाघ, कन्हैय्या वाघ, दर्श राज, सुबोधिनी जनबंधु, स्वरीत दांडळे, सक्षम बोपचे , अदिती बेजलवर, प्रणिती पवार, तेजस्वी बांगडे, कैवल्य हेडावू, अद्वेष हुमणे, आर्यन सूर्यवंशी, आलिया धरने, स्वर सेलोकार, रिद्धीमा दुबे, आरणा नशीने, निशीद पटले, वेदांशी बोपचे, प्रिन्स दशेरीया, सागर परतेकी, अदिती पांडे, अर्पित तिवारी, साक्षी तांगडपल्लीवार या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस निमित्य विविध प्रतियोगीते साठी बक्षिसे देण्यात आलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शीला दुबे आणि सरस्वती परिहार यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सरस्वती परिहार यांनी केले.