*अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागा तर्फे रुग्णांना फळ वाटप ; उर्जा मंत्री मा.ना.नितीन राऊत स यांच्या वाढदिवसानिमित्त  राबविला उपक्रम*

0
544
Google search engine
Google search engine

 

 

दि.०९/१०/२०२१ / अमरावती :-

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्री तथा (नागपूर पालकमंत्री) मा.ना.नितीन राऊत साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, जिल्हा अध्यक्ष सागरभाऊ कलाने यांनी राबिविले विविध कार्यक्रम. सदर कार्यक्रम हा प्रदेश उपाध्यक्ष मा. राजेशभाऊ लाडे व अमरावती जिल्हा प्रभारी मा.महेंद्रभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मा.सागर भाऊ कलाने यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. दि.०९/१०/२०२१ रोजी जिल्हा सामान्य रुणालय येथे रुग्णांना फळे तसेच बिस्कीट वाटप उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांना शालेय साहित्य वाटप सुद्धा करण्यात आले .

ऊर्जा मंत्री मा.ना.नितीन राऊत साहेब हे नेहमीच वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब , वंचीत , पीडित व समाजातील उपेक्षित घटकांना मदत करून ते आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतात. याचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातील सर्व पदाधिकारी यांनी विभागाच्यावतीने समाज उपयोगी कार्यक्रम करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातर्फे सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले तसेच होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष मा.सागर भाऊ कलाने उपस्तीत सर्वज्ञ फाउंडेशन रोटी बँक चे अध्यक्ष मनीषभाऊ पावडे, सामाजसेवक राजेशभाऊ ठाकूर, बाबाराव हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेश्राम, जिल्हा संयोजक जितेश अंभोरे, गजानन खंडारे, अक्षय कुमरे, अंशुल उज्जैनकर, सुरेश खंडारे, सुहास मनवर, पवन वाकोडे, अझर शेख, पृथ्वी शहारे, पवन शेकदार, कमलेश आत्राम, गजानन खडसे, राहुल मेश्राम, राजकुमार गुळसुंदरे, आशु तिखाडे, गौरव धांडे, परेश भुयार, कृष्णा आत्राम,अभिनव निखार, अजिंक्य पंचवटे, संजू विश्वकर्मा, संदीप दामले, आदी उपस्थित होते.