जुन्या वर्गमित्रांनी केला कर्तुत्ववान मित्रांचा सत्कार

0
395
Google search engine
Google search engine

जुन्या वर्गमित्रांनी केला कर्तुत्ववान मित्रांचा सत्कार शेगाव:—- स्थानिक डॉक्टर दिनेश अग्रवाल यांच्या दवाखान्यात जुने वर्गमित्र एकत्र येऊन यांनी दिनांक २६ जानेवारी सोमवार रोजी रात्री आठ वाजता आपापल्या क्षेत्रात कर्तुत्ववान असणाऱ्या मित्रांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पत्रकार क्षेत्रात तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच वर्णी लागलेले पत्रकार नानाराव पाटील व राष्ट्रवादी पक्षाच्या शहर अध्यक्षपदी नव नियुक्त झालेले दिनेश साळुंके या मित्रांचा सत्कार करण्यात आला शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता वर्ग 10 मधील सर्व मित्रांनी एकत्र आणत एक ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून आपल्या जुन्या मित्रांना दिलासा प्रेरणा व आपुलकीची उब या माध्यमातून सतत मिळत असते त्या माध्यमातूनच हा सत्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये डॉक्टर दिनेश अग्रवाल, डॉक्टर मोहन बानोले, सतीश बुरुंगले ,विजय घोराडे, संजय चौथे, सुनील तोष्णीवाल (मल) ,श्रीकांत हिंगणे सुनील शेगोकार, नरेश थानवी ,हरीश पालडीवाल, अजय अहिर, दीपक केला,मनिष रॉय, श्याम जोशी,सुनील ठोंबरे,कैलास राठी, मनीष पंपालीया , इंजनियर प्रशांत बानोले, आनंद राय इत्यादी मित्रांची उपस्थिती प्रामुख्याने होती.