हिंगणघाट :- प्रा. अंकिता हत्याकांड मध्ये विकेश (विक्की) नगराळे ला जन्मठेपेची शिक्षा

0
3646
Google search engine
Google search engine

हिंगणघाट :-

वर्धा – जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश उर्फ विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपीला दोषी करार दिल्यानंतर आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आज ऍड. उज्जवल निकम यांनी अनेक दाखले दिले. थरकाप उडविणाऱ्या या जळीतप्रकरणात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात अंत झाला होता. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी बुधावारी स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवून आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज न्यायालयाने दोषी विकेश उर्फ विक्की नरगाळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

काय आहे प्रकरण?

अंकिता हिंगणघाटच्या महाविद्यालयात प्राध्यापिका होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी. अंकिता 3 फेब्रुवारी 2020 रोजी गावाहून बसने हिंगणघाटला गेली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात होती. विकेश नगराळेने पेट्रोल ओतून तिला पेटवले. अंकिताला नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तू माझ्याशी लग्न का केलं नाही, म्हणून त्याने सूड उगविला.