💥ब्रेकिंग न्यूज💥 *राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांना कोर्टाने सुनावली शिक्षा

0
8678
Google search engine
Google search engine

अमरावती / चांदुर बाजार :-

2014 ची विधानसभा निवडणुक 

2 महिने सश्रम कारावासाची सुनावली शिक्षा.

 

भाजपचे माजी नगरसेवक श्री गोपाल तिरमारे यांनी केली होती तक्रार

 

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा….सोबतच दंड ठोठावला आहे.

मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू यांना महागात पडले असून याबाबत भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली होती….

मिळालेल्या माहितीनुसार चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली होती की, आमदार कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत हा फ्लॅट विकत घेतला. 19 एप्रिल 2011 रोजी त्या फ्लॅटचा ताबा आमदार कडू यांनी घेतला आहे. त्यानंतर त्यांनी अचलपूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर केला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते.