शेतकऱ्याची रंगपंचमीच्या दिवशी  आत्महत्या नापिकी व कर्जामुळे घेतले टोकाचं पाऊल..

0
537
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे:-
सततच्या नापिकीमुळे हवालदिल झालेला व कर्ज बाजारी पणामुळे एका शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा गावात घडली.
नीलकंठ तुळशीराम ठोंबरे (वय ५६) असे त्या दुर्दैवी शेतकऱ्यांचे नाव आहे. रंगपंचमीच्या दिवशी भिलटेक ते  कळमजापूर शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याकडे २ एकर शेती असुन सदर त्यांच्या कडे भारतीय स्टेट बँक, शाखा पळसखेडचे कर्ज आहे. तसेच आणखी काही खाजगी लोकांचे सुद्धा अंगावर कर्ज असल्याचे समजते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी आहे.