अमरावतीत ट्रक-कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

0
15266
Google search engine
Google search engine

अमरावती :-

साखरपुड्यासाठी जाणाऱ्या तवेराला विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाला यात तवेरा मधील पाच जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी आहेत.अमरावती जवळच्या अंजनगाव बारी येथील अनिकेत पोकळे या युवकाचा आज शिरजगाव कसबा येथे साखरपुडा आज होणार होता आज रविवारी सकाळी अंजनगाव बारी वरून राष्ट्रीय महामार्ग मार्गे रहाटगाव ते वलगाव जाणाऱ्या रिंग रोड मार्गे पोकळे परिवार चार चाकी वाहनासह करजगाव च्या दिशेने निघाले होते.

 

अंजनगाव बारी येथील रोशन रमेश आखरे याचे वाहनात पोकळे परिवारातील नऊ जण बसले होते ही तवेरा रहाटगाव वलगाव रिंग रोड मार्गे शिरजगाव कसबा कडे जाणार तेवढ्यात हॉटेल कंदील नजीक, ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक वर जाऊन ही तवेरा आदळली व यात भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की तवेरा गाडीतील चार जण जागीच ठार झाले.तर एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान दगावला.परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी ही तवेरा रस्त्याच्या कडेला लावली व इतरही जखमींना तातडीने तवेरा हातून काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

 

या भीषण अपघातात तवेरा चा संपूर्ण चेंदामेंदा झाला तर ट्रकचे देखील पुढील दोन चाके अक्षरशः तुटून पडली ट्रक एका खांबावर जाऊन आदळला यात काम पूर्ण पणे तुटून पडला. या अपघातात घटनास्थळी -रोशन रमेश आखरे वय 26 वर्ष अंजनगाव बारी, प्रतिभा सुभाष पोकळे वय 50 अंजनगाव बारी कृष्णा सचिन गाडगे वय 8 शिरजगाव कसबा, गजानन दारोकार वय 45 रा.जरुड हे चार जण जागीच ठार झाले. पाचव्या मृतकाचे नाव अद्याप पर्यंत समजू शकले नाही या अपघातात अंजनगाव बारी येथील विजय भाऊराव पोकळे 55,  ललिता विजय पोकळे 50 ,सुभाष भाऊराव पोकळे 60 ,सुरेश भाऊराव पोकळे 58 ,संगीता गजानन दारोकार राहणार जरुड व रश्मी सचिन गाडगे राहणार शिरसगाव कसबा हे गंभीर जखमी झाले.घटनास्थळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन पाहणी करत घटनेची माहिती घेतली तर घटनास्थळी रक्ताचे मोठे लोट दिसून आले,या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून आली होती तर नांदगाव पेठ पोलीस घटनेचा तपास करीत असून ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे