शेगाव येथे ओबीसी संमेलनाला मुख्यमंत्री यांची हजेरी….

0
447
Google search engine
Google search engine

शेगाव येथे ओबीसी संमेलनाला मुख्यमंत्री यांची हजेरी….

खामगांव काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी घेतले टोकाचे परिश्रम

शेगाव :- ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन घेण्यात आले या संमेलन मध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा, केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करावी तसेच देश पातळीवर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे या सर्व विषयावर संमेलनामध्ये चर्चा करण्यात आली .या समेलना मध्ये छत्तीसगडच्या मुख्यमंत्री भुपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावली… राज्यात ओबीसी प्रश्नावर खूप मोठं वादंग सुरू आहे, राज्यसरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीर उभे आहे, ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय पुढील निवडणुका होणार नसल्याचे सूतोवाच नाना पटोले यांनी केले,
परंतु जर का भव्य कार्यक्रम ओ.बि.सी. समाजाचा होता तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ना का आमंत्रण नाही का ते ओ.बि.सी समाजाचे नाही याचा अर्थ असा की कार्यक्रम काँग्रेसचा पण नाव समाजाचे पुढे केले म्हणजे इथेपण राजकारणच…
शहरात अवैध बॅनर लावून शासनाने शासनाचा कर बुडवला या कार्यक्रमा वेळी ओबीसी समाजाची दिशा भुल करीत इतर समजा विरुद्ध त्यांना लाडवत नसावे

त्या सोबतच विचार मंचाने पण आपल आपले मुद्दे मांडत केंद्र सरकार वर निशाणा साधले व आपले ठवराव स्वतःचा मंजूर करून घेतले.
या कार्यक्रमात खामगांव काँग्रेस कार्यकर्ते धनंजय देशमुख व सकर्यानी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्यामुळेच हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडला.