पात्रुड येथे पंकज कुमावत यांच्या पथकाने 32 लाखाचा गुटखा केला जप्त

0
373

 

बीड  नितीन ढाकणे :- माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे 32 लाख रुपयांचा गुटखा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने जप्त केल्याची घटना आज घडली आहे
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त माहितीद्वारे माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे गुटखा असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली होती. यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कमावत यांच्या मार्गदर्शना मध्ये त्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथे मोमीन बाबु अब्दुल मजिद यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये पथकाने धाड टाकली, यामध्ये तब्बल 32 लाख 48 हजार रुपयांचा गुटखा निदर्शनास आला सदर गुटखा पोलिसांनी ताब्यात घेऊन माजलगाव ठाण्याच्या स्वाधीन केला. सदर कारवाई सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि मिसळे , पोना दिलीप गित्ते,पोना अनिल मंदे, पोशी महादेव बहिरवाल, व होमगार्ड बिक्कड ,शिरसाट यांनी केली आहे .