अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- आता …उपकार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ; वर्कऑर्डर देण्यासाठी 12 हजाराची घेतली लाच

0
3691
Google search engine
Google search engine

*Morshi Amravati*

तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मोर्शी विभाग येथे केलेल्या कुलर मेंटेनन्स कामाची वर्कऑर्डर देण्यासाठी श्री विनोद सुवालाल पवार वय ४३ वर्ष व्यवसाय -नोकरी उपकार्यकारी अभियंता यांनी दि. 27. 4. 2022 रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान 15000/- रु लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 12000/-रू. लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लगेच आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान श्री विनोद सुवालाल पवार यांनी पंचासमक्ष 12000/- रु.लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून  स्वतःचा कबिन मधे म.रा.वी.वी कं मर्या. मोर्शी विभाग अमरावती येथे स्वीकारले वरून यातील श्री विनोद सुवालाल पवार वय ४३ वर्ष व्यवसाय -नोकरी उपकार्यकारी अभियंता यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध पोस्टे मोर्शी अमरावती ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.