मोठी बातमी :- रेती तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला, पहाटे ३ वाजताचा थरार

0
1489
Google search engine
Google search engine

कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर रेती तस्करांनी हल्ला केल्याची घटना पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली. यात एसडीओ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. पवनी ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

भंडाराचे उपविभागीय अधिकारी श्री रवींद्र राठोड यांच्याकडे रेती तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर वाहनाने गेले. पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास रेतीचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले. टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर अडविला. काही कळायच्या आता १५ ते २० तस्करांनी हातात काठ्या व दगड घेऊन हल्ला केला. यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले. तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.