माजी नगरसेवकाच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला, चांदुर रेल्वे च्या तहसील कार्यालयासमोरील घटना

0
783
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. ११) रात्री ८ वाजताच्या दरम्यान स्थानिक तहसिल कार्यालयासमोरील चायनीज दुकाजवळील घडली असुन मारेकरू फरार झाला आहे. आर्यन महेश कलावटे (वय २० वर्ष) असे जखमी युवकाचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील माजी नगरसेवक महेश कलावटे यांचा मुलगा आर्यन महेश कलावटे हा चायनीज खाण्याकरिता तहसिल कार्यालयासमोरील दुकानावर आला असता तेथे आलेल्या एकाने आर्यनच्या पोटावर चाकूने हल्ला केला. व मारेकरू तेथून पसार झाला. जखमी आर्यनला चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालय मधून जखमीला अमरावती रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.