अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- घरांची भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

0
3503
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-
*तालुक्यातील फुबगाव येथे घरांची भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे

चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर येथे आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास अरुण नारायण वैराळे यांचें घर पावसाने कोसळल्याने त्यात पत्नी चंदा अरुण वैराळे (३५), मुलगी पायल वैराळे (७)घटनास्थळी मृत्यू तर नारायण वैराळे,अरुण वैराळे,ओम वैराळे(१०) हे जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, शेजारी मदतीला धावून आले, घटनास्थळी तहसीलदार व पोलिस प्रशासन दाखल….