*तालुक्यातील तळेगाव व आसेगांव मंडळ अतिवृष्टीतून वगळल्याने शेतकरी संतप्त ; मदतीपासून वंचित राहणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन*

0
408
Google search engine
Google search engine

 

चांदूर बाजार तालुक्यात एकूण सात महसूल मंडळा पैकी तळेगाव व आसेगाव या दोन मंडळाला अतिवृष्टी तून वगळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देवून संताप व्यक्त केला झालेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली.
चांदूर बाजार तालुक्यात सर्वच साठी महसूल मंडळात सर्वत्र सारखाच पाऊस होऊन अतिवृष्टी झालेली असताना मात्र तळेगाव व आसेगांव या दोन मंडलात जास्त अतिवृष्टी होवून नुकसान झालेले आहे. असे असताना सुद्धा एकूण सात महसूल मंडळापैकी दोनच महसूल मंडळाला वगळण्यात आल्याने कृषी व महसूल विभागाकडून काहीतरी निश्चितच घोळ झालेला असून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी जेणेकरून एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याकरिता वगळण्यात आलेल्या मंडळातील शेकडो शेतकरी आपली मागणी घेवून तहसीलदार यांच्या कडे धडकले.
वंचित सर्व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरिता वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पक्षाकडून पाठपुरावा करण्यात येईल असे भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले