*गोपाल तिरमारे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप*

0
313
Google search engine
Google search engine

 

चांदूर बाजार:
भारतीय जनता पक्षाचे तालुका महामंत्री तथा माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद प्राथमिक इंग्रजी शाळा व नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वितरण व सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कार्यक्रमात भाजपचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका उपाध्यक्ष सुमित निंभोरकर, संजय थेलकर, भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन तायवाडे, जसापुरचे पोलीस पाटील राहुल उके, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रांजली चर्जन, उपाध्यक्ष राजेंद्र भुस्कडे, भाजपचे संजय लोनारकर, राज चव्हाण, गजानन राऊत, प्रणित जवंजाळ, विकी राठी, साहेबराव अस्वार, राम यावले, अनिल वाठ, धीरज माहुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नंदकिशोर टाक यांनी केले तसेच सर्व शिक्षक मंडळी यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.