*Amravati Breaking* 💰💰🤝🤝 अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) दोन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

0
4564
Google search engine
Google search engine

 

 

अमरावती :-

तक्रारदार यांच्यावर कलम 110 प्रमाणे दाखल असलेली प्रतिबंधक केस निकाली काढण्याकरिता स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण येथील पोलीस कर्मचारी श्री. हरणे व श्री. ढोके यांनी तक्रारदाराला 1,500/- रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार 10/08/2022 रोजी तक्रार लाचलुचपत विभाग ला दिली तदनंतर सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान (१) श्री. विशाल रामरावजी हरणे, पोलीस हवालदार, ब. न. 1918, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण २) श्री. प्रशांत महादेवराव ढोके, पोलीस नाईक, ब. न. 1753, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण यांनी तक्रारदार यांना 110 चे प्रतिबंधक कार्यवाही लवकर निकाली काढण्याकरिता 1500/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

आज दि. 20.09.2022 रोजी आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे श्री. विशाल रामरावजी हरणे, पोलीस हवालदार, ब. न. 1918, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण यांनी तक्रारदार यांच्या कडून एकून लाच रक्कमे पैकी 500/- रुपये लाच रक्कम स्वीकारली वरून श्री. विशाल रामरावजी हरणे, पोलीस हवालदार, ब. न. 1918, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण यांना ताब्यात घेण्यात आले असून, नमूद आरोपीता विरुद्ध पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

सदरची कार्यवाही व *मार्गदर्शन* – मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

*कारवाई पथक* –
अमोल कडू, पोलीस निरीक्षक, केतन मांजरे , पोलीस निरीक्षक, पोना/ विनोद कुंजाम , व इतर ला.प्र.वी.अमरावती. यांनी केली