अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील व्हेंटिलेटर मशीन ला आग लागण्याची माहिती

0
4362
Google search engine
Google search engine

2 नवजात बालके किरकोळ झखमी 

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही 

 

अमरावती :  जिल्हा स्त्री रुग्णालयात  लहान मुलांचा अतिदक्षता कक्षात आज रविवारी सकाळी ११ वाजताचा आसपास   व्हेंटिलेटर मशीन ला शॉट सर्किट  मुळे आग लागण्याची घटना घडली  . या  धुरामुळे 8 नवजात बालकांना इजा पोहोचली असून त्यांना स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट  करण्यात आले आहे.

घटनेनंतर जिल्हा स्री रुग्णालयात एकच तारांबळ उडाली. काही क्षणातच रुग्णालय परिसरात अंबुलन्स पोहोचल्या. धावपळीमुळे प्रशासन हादरून गेले. आठ नवजात बालकांना स्थलांतरित करण्यात आले. फायर ब्रिगेड चा दोन गाड्यानि आगीवर नियंत्रण आणले ,  आज अमरावती दौऱ्यावर असलेले श्री नाना भाऊ पटोले यांनीही घटनास्थळी भेट दिली यावेळी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्यात.