अमरावती ब्रेकिंग :- भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ची दुचाकीला भीषण धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, कार चालक घटनास्थळावरून पळाला

0
9878
Google search engine
Google search engine

 

अमरावती – स्थानिक नवाथे समोर बडनेरा रोड वर  साई नगर चा गेट च्या चौकात एका भरधाव येणाऱ्या कार ने एका MH 32 AP 9423 पॅशन प्रो दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे सदर घटना ही 26 सप्टेंबर  मध्यरात्री 12 ते 12.30 च्या मधात घडली मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही

धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून कार घेऊन पसार झाला प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितल्या नुसार पांढऱ्या कलर ची आय टेन कार होती शहरात आणखी 1 ते 2 जणांना सदर गाडीने धडक दिल्याची ही माहिती समोर आली आहे घटणास्थानावरून काही जणांनी कार चा पाठलाग केला परंतु सदर कार सातूरणा भागात दिसेनासी झाली घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून कार चालकाचा शोध घेणे सुरू केले आहे