अमरावती ब्रेकिंग :- अमरावती येथे ACB ची कार्यवाही उप-विभागीय अभियंता लाचलुचपत विभागाचा जाळ्यात

0
7654
Google search engine
Google search engine

*Amravati Update*
💰💰🤝🤝

यातील मूर्तिजापूर येथील तक्रारदार दिनांक 04 /10/ 2022 रोजी ACB ला तक्रार दिली की त्यांचे मुलाने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दर्यापूर अंतर्गत नांदूरून गावांमधील सामाजिक सभागृहाचे केलेले बांधकामाचे व नाचना गावातील रस्त्याचे डांबरीकरण केलेल्या कामाचे एकूण 16,88,999/- रुपयाचे बिल मंजूर करण्याकरिता जिल्हा परिषद उपविभाग दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता श्री तेजकुमार येवले हे लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार दिली.दिलेल्या तक्राराचे अनुषंगाने दिनांक 04/10/2022 रोजी पंचायत समक्ष पडताळणी कारवाई दरम्यान श्री. तेजकुमार वसंतराव येवले, यांनी तक्रारदार यांना वर नमूद केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्याकरिता 55,000/-रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 30,000/- रुपये स्वीकारल्याचे मान्य केले त्यावरून दिनांक 06/10/2022 रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान श्री. तेजकुमार वसंतराव येवले, यांनी तक्रारदार यांचे कडून पहिला हप्ता 30,000/- रुपये लाच रक्कम कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग कार्यालय जिल्हा परिषद अमरावती येथे स्वीकारल्याने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. असून, नमूद आरोपी विरुद्ध पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई  केतन मांजरे, पोलीस निरीक्षक, अमोल कडु , पोलीस निरीक्षक, पोना/ विनोद कुंजाम , पोशि शैलेश कडु, रोशन खंडारे चापोउपनि सतीश किटूकले ला.प्र.वी.अमरावती. यांनी केली