खामगाव शेगाव रोडवर खाजगी बसचा अपघात ; अपूर्ण कामामुळे झाला अपघात

0
873
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी – विनायक देशमुख :- 

खामगांव महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे खामगाव शेगाव दरम्यान लासुरा फाटा येथे एक खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत अपघात इतका भीषण होता की खाजगी प्रवासी बसणे तीन पलट्या खाऊन ही बस बाजूच्या नाल्यात पडली आहे ही बस शेगावहून उज्जैन येथे जात होती सकाळी सकाळी हा अपघात झाल्याने या ठिकाणी मदतीसाठी कोणी धावून आला नाही रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी वाहने थांबून सदर बसमधील प्रवाशांना बाहेर काढले व खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले