*अमरावती ब्रेकिंग :- भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 13 जण जखमी

0
7401
Google search engine
Google search engine

 

अमरावती :-  तिवस्यावरून कुऱ्हा मार्गे जाणारा MH 46-1505 क्रमांकाचा भरधाव ट्रकने कुऱ्हा वरून प्रवासी घेऊन येणाऱ्या ऑटो क्रमांक MH 27BW 3833 व MH 27 DD 9543 क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने मोठा अपघात घडला या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर यामध्ये एकूण 13 जण जखमी असून 7 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत,अपघातातील जखमीना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हळविण्यात आले असून एकीला नागपूर रेफर करण्यात आले जखमीमध्ये उमेश शिंदे, रा. मोझरी,शितल माटे,रा. जळका,रेखा वाघमारे, शे. बाजार,सिमा तेलंग,रोनक विशाल तेलंग,हिंगणघाट,श्रीकृष्ण वाघमारे,शे. बाजार,आरोही तेलंग,श्वेता शेंद्रे,विराट शेंद्रे,दीप्ती शेंद्रे,प्रांजली हेमंत गोरखेडे, ऋतुश्री गौरखेडे,सानवी गौरखेडे सर्व रा. तिवसा अशी जखमींची नावे आहेत,तर सोमा तापा कोरटकर वय.45, रा. घोटा, व कैलास वाघमारे, वय.50. रा.शे.बाजार असे मृतकाचे नावे आहेत