अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- नगरपंचायत मुख्याधिकारी एसीबी च्या जाळ्यात ,२० हजाराची लाच घेताना अटक

0
10338
Google search engine
Google search engine
अमरावती:-
        स्थानिक तक्रारदार यांना   गारमेंट व्यवसाय आणि शिलाई प्रशिक्षण सुरू करण्यासाठी NOC देण्याकरिता लाच मागणे भातकुली नगर पंचायत च्या मुख्याधिकारी श्रीमती करिष्मा वैद्य यांना चांगलेच भोवले आहे. लाच स्वीकारताना त्यांना आज त्यांच्या राहत्या घरी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
           उपलब्ध माहिती नुसार  या प्रकरणातील तक्रारदार यांना भातकुली येथे शिलाई प्रशिक्षण आणि गारमेंट्स व्यवसाय टाकायचा होता. त्यासाठी त्यांना नगर पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता त्यांनी संबंधिताला 50 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांच्या तक्रारी नंतर दि. 2/11/ 2022 रोजी पडताळणी केली असता तडजोडी अंती 20 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अमरावती परिक्षेत्र अमरावती, मा. अप्पर पोलीस अधीक्षक,अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पो.नि. प्रवीण पाटील यांनी केली.
    या कारवाईत प्रविण पाटील पोलीस निरीक्षक,
केतन मांजरे पोलिस निरीक्षक, मपोहा साबळे पोना-राहुल वंजारी, पोना-विनोद कुंजाम ,
पोना- युवराज राठोड चालक पोना नाईक ला.प्र.वी.अमरावती.यांनी सहभाग नोंदविला