५८ हजार रूपये असलेली बॅग भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीमधून लंपास , चांदूर स्टेट बँकेसमोरील घटना वृध्दाने बँकेतून काढले होते पैसे

124
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
एका ६८ वर्षीय वृध्दाने बँकेतून पैसे काढल्यानंतर बँकेसमोरूनच ५८ हजार रूपये असलेली बॅग लंपास केल्याची घटना चांदूर रेल्वे शहरातील स्टेट बँकेसमोर १४ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत कृष्णराव खेरडे रा. जळका जगताप यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, चांदूर रेल्वे शाखेतून ५० हजार रुपये काढून त्यांचे जवळ असलेल्या निळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये ठेवून बँकेबाहेर आले. त्यानंतर त्यांनी मोटरसायकलला असलेल्या डिक्कीमध्ये ती बॅग ठेवली व मोटरसायकल मागे घेत असताना त्यांचा मोटरसायकल वरून तोल जाऊन कुणाचातरी धक्का लागल्याने ते खाली पडले. नंतर त्यांनी गाडीला उचलून चालू करून ते त्यांच्या घरी जळका जगताप येथे पोहोचले. मोटरसायकलची डिक्की उघडली असता त्यांना निळ्या रंगाची हॅन्डबॅग दिसून आली नाही. ज्यावेळी ते बँकेसमोर पडले त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीच्या डिक्कीमधील हॅन्डबॅग ज्यामध्ये ५० हजार रुपये ठेवले होते व त्या अगोदर त्या बॅगमध्ये ८ हजार रुपये होते, असे एकूण ५८ हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली अशी तक्रार फिर्यादी भरत खेरडे यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दिली. सदर तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवी कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.
जाहिरात
Previous articleअमरावती जिल्हा ब्रेकिंग :- नगरपंचायत मुख्याधिकारी एसीबी च्या जाळ्यात ,२० हजाराची लाच घेताना अटक
Next articleराज ठाकरेंचेआदेश,’शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा’