भक्ती शक्ती संगम सोहळा व श्रीमद भागवत कथा २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चांदूर रेल्वेत आयोजन

0
270
Google search engine
Google search engine
ज्ञान यज्ञ नामसंकीर्तन सप्ताह सोहळा व वारकरी अधिवेशन
वारकरी महामंडळ शाखा, चांदूर रेल्वेचे आयोजन
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य तालुका शाखा, चांदूर रेल्वे द्वारा आयोजित भक्ती शक्ती संगम सोहळा, श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ नामसंकीर्तन सप्ताह सोहळा व वारकरी अधिवेशन २५ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ पर्यंत चांदूर रेल्वे शहरातील संताबाई यादव मंगल कार्यालय समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. यात श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हभप सदाशिव महाराज मोरे आळंदीकर राहणार आहे.
यात दैनंदिन कार्यक्रम काकड आरती ध्यान सकाळी ५ ते ६ वाजता, भागवत सकाळी ९ ते ११.३० व दुपारी ३ ते ५ वाजतापर्यंत, व्याख्यान दुपारी १२ ते २ पर्यंत, हरिपाठ, प्रार्थना सायंकाळी ५ ते ६ वाजतापर्यंत, हरिकीर्तन सायंकाळी ६.३० ते ८.३० पर्यंत व भजन संध्या रात्री ९ ते ११ वाजतापर्यंत असा राहणार आहे. तर २५ डिसेंबर रोजी हभप पुंडलिक महाराज बोळवटकर (आळंदी), २६ डिसेंबर रोजी हभप रमेश पंत महाराज खेरडे (चांदूर रेल्वे), २७ डिसेंबर रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव), २८ डिसेंबर रोजी हभप उल्हास महाराज सूर्यवंशी (अध्यापक व वारकरी शिक्षण संस्था, आळंदी), २९ डिसेंबर रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ (वारी भैरवगड), ३० डिसेंबर रोजी हभप समाधान महाराज शर्मा (बीड), ३१ डिसेंबर रोजी हभप तुकाराम महाराज मुळीक (सचिव, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी) यांचे किर्तन होणार आहे. व काल्याचे कीर्तन १ जानेवारी २०२३ रोजी हभप प्रकाश महाराज जवंजाळ (अध्यक्ष, वारकरी महाराष्‍ट्र राज्य तथा सदस्य, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर पंढरपूर) हे करणार आहे. वारकरी अधिवेशन व सर्व पंथीय परीषद ३० डिसेंबर ला दुपारी ४ ते ६ वाजतापर्यंत होणार असुन दिंडी मिरवणूक ३१ डिसेंबरला दुपारी ३ वाजता निघणार आहे. तरी चांदूर रेल्वे तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष अक्षय महाराज हरणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाराज मस्के, हरिभाऊ महाराज पाचकवडे, सचिव शुभम महाराज मस्के, कोषाध्यक्ष मोरेश्वर महाराज वेखंडे, संपर्कप्रमुख संदीप महाराज तायडे, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत महाराज काकडे, सदस्य किरण महाराज राऊत, श्याम महाराज जोशी, भूषण काळे, धोंडूपंत महाराज दुधाने, अभिजीत पाचपोर, आदेश राजनेकर आदींनी केले आहे