आमदार बच्चू भाऊ कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात, डोक्याला मार

8961

अमरावती :-  आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना अचानक दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. अज्ञात वाहनाचा धडकेत बच्चू कडू हे  जखमी झाले आहेत. बच्चू कडू यांच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर पार लागल्याची माहिती असून, डोक्याला चार टाके पडल्याचं वृत्त आहे. बच्चू कडू हे रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळल्यानं डोक्याला मार लागल्याची माहिती आहे.

 

*आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.*
*आपला-  बच्चु कडू*

जाहिरात
Previous articleजय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीने श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
Next articleब्रेकिंग न्यूज :- अमरावती जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांची पुणे येथे आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश