अमरावती ब्रेकिंग :- एसटी बस व ट्रक चा अपघात अनेक प्रवासी जखमी

0
6774
Google search engine
Google search engine

अमरावती : शहरातील नांदगाव पेठ जवळील पिंपळविहिर ते सावर्डी येथे आज मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास एसटीने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये एसटीतील प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुगणालय इर्विन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवळपास ३२ किरकोळ जखमी प्रवासी उपचारासाठी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.

नागपुर ते आकोट मार्ग जाणारी एम.एच.४० एक्यू ६४३३ क्रमांकाच्या एसटीने पिपंळीविहीर ते सावर्डी या मार्गावर समोर असलेल्या एम.एच.२० बी.टी ७२८८ क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी हे प्रवासकरत होते

जखमी प्रवासी :-

सरला कदम ,अकोट(40), लीना हरमकर , नागपूर (45) , निकिता कोठारी , कारंजा घाडगे (34), दिगंबर पाठक  वर्धा रोड (31), सविता आढळणे ,नरसापूर (37) , वर्षा वानखडे करजगाव (36), ज्ञानेश्वर म्हहले तिवसा (40), रोशन भुसारी नागपूर (38), मुरलीधर हरमकर नागपूर (56) ,यतार्थ जितेंद्र राऊत नागपूर (10) , समीर लवनकर खापरी (36) , दीप्ती राऊत  नागपूर (37) , विष्णुपंथ गाथे गुरुदेव नगर (73), उषा दंदे  अमरावती (66), प्रेमसिंग ठाकूर मोझरी (75) , प्रियांका कावरे (31) समृद्धी कावरे(3)  सोहम कावरे(3) सतीश कावरे(34)  शिरजगाव , भागीरथी बेदरकर  कारला (62) , दीपक बेदरकर कारला (23) , मंगल डोहाळे कारंजा घाडगे (42) , चंद्रप्रकाश यादव नागपूर (51) ,  अक्रम रज्जाक नागपूर (35),  मोहन बेले (58) ललिता बेले(25)   शिरजगाव मोझरी , दिलीप केदारे आष्टी (62),  मीनल पाटील अमरावती (42),  अनिल कनोजे नागपूर (35) ,  चेतन तीतीरमारे नागपूर (32), श्रीकांत सोनटक्के  नागपूर (30)