अमरावती ब्रेकिंग :- गोवंश तस्करी, लसूण पोत्याच्या आडून गौवंश तस्करी करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

0
2363
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-  स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी मोर्शी वरून चांदुर बाजार येणाऱ्या एका आयशर ट्रक ला थांबवून   त्याला ताब्यात घेतले , तदनंतर पोलीस स्टेशनला ट्रकची  तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश आढळून आले. ट्रक मध्ये मागे लसणाचे पोते ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यात गायी भरण्यात आल्या होत्या  सदर 47 गोवंश बेलोरा येथील गौरक्षण मध्ये पाठवण्यात आले आहेत   त्यापैकी 3 गायी या मृतावस्थेत आढळलेल्या आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे  यात आयशर चालक संतोष देववंशी सारंगपूर जी.राजगड (मध्य प्रदेश, तसेच वाहक राहुल विश्वकर्मा  रा.सुमनेर मध्य प्रदेश  अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून  गोवंश , आयशर ट्रक, असा 19 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सदरची कारवाई चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अशोक जाधव , एपीआय प्रमोद राऊत , एपीआय नरेंद्र पेंदोर ,पीएसआय विजय लेव्हारकर , एएसआय विनोद  इंगळे , महेश काळे , अमोल सानप , अजय पात्रे , अरविंद सरोदे यांनी केली आहे