*शहरात आज काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल ; पहा पर्यायी मार्ग*

0
441
Google search engine
Google search engine

 

अमरावती, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त समारंभ, मिरवणूक आदी लक्षात घेता आज शुक्रवार (दि. 14 एप्रिल) शहरातील काही रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केले आहे.

आज शुक्रवारी सकाळी 5 ते रात्री 12 दरम्यान शहरातील पाच रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. त्यात इर्विन चौक ते खापर्डे बगीचा, गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक, बाबा कॉर्नर ते इर्विन चौक, मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक, इर्विन चौक ते मालवीय चौक या रस्त्यांचा समावेश आहे. मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक ते वाहतूक पोलीस कार्यालय व इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळा प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

*पर्यायी रस्त्यांचा करा वापर*

त्यामुळे इर्विन चौक ते खापर्डे बगीचा मार्गावरील वाहतूक एस. टी. बसस्थानक मार्गावरून जावी. गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गावरील वाहतूक पोलीस पेट्रोलपंप चौक ते बाबा कॉर्नर ते विलासनगर रोड या मार्गावरून जावी. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक मार्गावरील वाहतूक लेखुमल चौक किंवा पोलीस पेट्रोलपंप मार्गे जाईल. रेल्वेस्थानक चौक ते मर्च्युरी टी पॉईंट मार्गाने इर्विनकडे जाणारी वाहतूक रेल्वेस्थानक- बसस्थानक मार्ग किंवा जयस्तंभ चौक, दीपक चौक, चौधरी चौक आदी मार्गांचा अवलंब करेल.

मालवीस चौक ते इर्विन चौकाकडे जाणा-या वाहनांनी मालवीय चौक, जयस्तंभ चौक, रेल्वेस्थानक चौकाचा मार्ग वापरावा, असे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे. रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, अत्यावश्यक सेवा वाहनांना हे लागू नाही.