शेगाव ब्रेकिंग :- श्री गजानन महाराज संस्थान ची माहिती आनंदसागर मधील आध्यात्मिक केंद्र भाविकासाठी सुरू

0
3179
Google search engine
Google search engine

 

शेगाव :दि.३ प्रतिनिधी
येथील श्री गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित आनंदसागर मधील आध्यात्मिक केंद्राचा काही भाग कोविड काळानंतर आहे त्या स्थितीमध्ये सुरु करण्यात आलेला आहे.यासंदर्भात शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थान चे वतीने मंदिर व परिसरात फलक लावण्यात आलेले आहेत.
आनंदसागरमधील आध्यात्मिक केंदात प्रवेश सेवार्थ (निःशुल्क) राहील. वेळ: सकाळी १० ते सायं. ५ वा. पर्यंत सायं. ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल.
शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते.
या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजीत अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आलीत.
श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर, आर्थिक घडी निट बसल्यावर तसेच आवश्यक सेवाधाऱ्यांची सेवा व पर्याप्त मुबलक पाणी उपलब्ध झालेवर आध्यात्मिक केंद्राची देखभाल-दुरुस्ती, काही भागाचे पुनर्निर्माण व पुढील विकास कार्ये हाती घेण्यात येतील.
यासठी बराच कालावधी लागणार आहे.तरी सर्वानी
सहकार्य करावे,असे श्री संस्थानचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांनी सुचना फलकाद्वारे कळविले आहे.