चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयाची खा.डॉ.अनिल बोंडे यांनी घेतली झाडाझडती ; नूतनीमारतीची ही केली पाहणी

0
1042
Google search engine
Google search engine

चांदूरबाजार : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज झाडाझडती घेत अधिकाऱ्यांना विविध बाबींमध्ये रुग्णहितार्थ सुधारनेसाठी आवश्यक त्या सूचना करत त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तसेच नूतन इमारतीची पाहणी सुद्धा त्यांनी केली.Vidarbha24News


राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे हे गुरुवारी चांदूरबाजार तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णहिताच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत असलेले जेवण, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, मानसिक आरोग्य कार्यक्रम, कर्मचाऱ्यांकरिता असलेले निवासस्थाने, प्रसाधनगृहे, क्षतीग्रस्त निवासस्थाने, जुनी इमारत, उद्यान सीसीटीव्ही व्यवस्था आधी ठिकाणांची चांगलीच झाडझडती घेतली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या विविध मागण्या लक्षात घेता त्या तत्काळ मंजूर करून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देखील त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना केल्या.विदर्भ चोवीस न्यूज. तसेच उपजिल्हा रुग्णालयाची नूतन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे या इमारतीची सुद्धा त्यांनी पाहणी केली.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने रुग्णहितार्थ सुरू करण्यात आलेल्या आरोग्य कार्यक्रमाचा देखील त्यांनी आढावा घेतला. दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये समन्वय साधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील डॉ. अनिल बोंडे यांनी केल्या. ज्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्या सुविधा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या सोबत चर्चा करून तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिले.
यावेळी प्रमोद कोरडे, प्रविन तायडे जिल्हा सरचिटणी, सुधीर रसे उपाध्यक्ष, मनोहर सुने
मुरली माकोडे ता अध्यक्ष, गोपाल तीसमार ता. सरचिटणी आनंद अहीर शहर अध्यक्ष , आशीष कोरडे ता.अध्यक्ष भाजयुमो, सचिन तायवाडे शहर अध्यक्ष भाजयुमो, प्रणित खवले जिल्हा सचिव भाजयुमो, अतुल दारोकर, रमेश तायवाडे, वैभव मनवर, नितीन टिंगणे , अतुल टाकरखेडे, दिपक निमकर,रोशन भेल, अतुल घाटोळ, भुषण निमकर, अनिल वाढ, गजानन राऊत, अभिजित सुयवंशी, मनिष नांगलीया, रावसाहेब घुलक्षे, राहुल कडु, विकि राठी, धिरज माहुरे, नंदकिशोर माहुरे, अमोल गवळी, अजिंक्य चुगडे,प्रदिप शमा, निलेश देशमुख, आयुष भांग, सौरभ डांगरे,आकाश आजनकर, राम यावले, साहेबराव भागवत, शिवम निघोंट, अनुप भागवत, सुरज ठाकुर, अक्षय रडके उपस्थित होते.