भारतीय महाविद्यालय,अमरावती बारावीचा 94.44 टक्के निकाल

0
576
Google search engine
Google search engine

 

अमरावती प्रतिनिधी : भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय, अमरावती येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12 वीचा निकाल 94.44 टक्केलागलेला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 97.42%,, कला शाखेचा 85.42%, वाणिज्य शाखेचा 83. 75 टक्के लागलेले आहे. सर्व तिन्ही विषयांमधून संमिश्र असा महाविद्यालायाचा एकंदरीत निकाल 94.44% लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवत विविध विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे. त्यामध्ये कु.निकिता शाम राठोड, कु.रचना टोणगोणकार, आयुष माहुरे, कु.प्रार्थना टांक, हर्ष बिधाने, कु. प्रतीक्षा घेबड, कु.अनुष्का ढवळे,सिद्धार्थ सुभाष तायडे आदी विद्यार्थ्यां कला, विज्ञान, वाणिज्य विषयात महाविद्यालयातून गुणवत्ता यादी स्थान पटकावला आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारतीय विद्या मंदिर,अमरावती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश कुळकर्णी, श्री.अनंतराव सोमवंशी, सरचिटणीस, भारतीय विद्या मंदिर, अमरावती व संस्थेच्या सर्व व्यवस्थापन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यशाबद्दल कौतुक केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा.सुशील अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.