पाऊले चालती पंढरीची वाट… श्रींच्या पालखीचे संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान

0
354
Google search engine
Google search engine

समीर देशमुख / शेगांव:-

https://youtu.be/tdn5yQP50ew

शेगांव श्रेष्ठ संत गजानन महाराज यांची पालखी आज विठुरायाच्या दरबारी जाण्यासाठी इथून निघाली ही पालखी किलोमीटरचा प्रवास करीत
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी आज संतनगरीतून पायदळ पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार ज्येष्ठ शुध्द सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले

सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होती  सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पुजा करण्यात येते. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकर्यासह एका गणवेषात,शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान झाले

श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री शेत्र पंढरपूर पोहोचणार आहे या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे. तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे 23 जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे..

ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत नगरीत दाखल होत असतात.