भूपालगडाबाबत लेखकांनी अनुभवसंपन्न लेखन करावे : डॉ. स्वाती शिंदे – पवार*

Google search engine
Google search engine

 

*भूपालगडाबाबत लेखकांनी अनुभवसंपन्न लेखन करावे : डॉ. स्वाती शिंदे – पवार

 

 

सांगली/कडेगाव न्युज:
लेखकांनी भूपालगड (बाणूरगड ) या ठिकाणी भेटी द्याव्यात, गडाबाबत अनुभवसंपन्न लेखन करावे, गडकिल्ला संवर्धन व पर्यटन स्थळासाठी होत असलेल्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे मत सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. स्वाती शिंदे – पवार यांनी व्यक्त केले .
आटपाडी तालुका साहित्य मंचातर्फे नुकतेच एकदिवशीय बहिर्जी नाईक शिदोरी साहित्य संमेलनाचे बाणूरगड (किल्ले भूपालगड ) या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते . या वेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून डॉ.शिंदे – पवार बोलत होत्या . यावेळी व्यासपिठावर आटपाडी तालुका साहित्य मंचाचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे, उद्घाटक साहित्यिक रघुराज मेटकरी, प्रमुख पाहुणे कथाकथनकार प्रा. विश्वनाथ गायकवाड, सुभाष बापू पाटील, माणदेशी साहित्यिक व समिक्षक डॉ.सयाजीराजे मोकाशी , कथाकार प्रा.साहेबराव चवरे , काष्ठशिल्पकार व साहित्यिक रमेश जावीर उपस्थित होते .
यावेळी बोलताना डॉ.शिंदे – पवार पुढे म्हणाल्या की, साध्या माणसांचा, संस्कारांचा, साहित्यिक विचारांचा प्रभाव माणसाला ऊर्जा प्रदान करीत असतो. या भूमीत आल्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बहिर्जी नाईक, फिरंगोजी नरसाळे या सर्वांच्या स्मृत्ती प्रचंड ऊर्जा देतात. ऊर्जेचे स्त्रोत असणारा इथला संस्कार, इथला इतिहास प्रचंड प्रेरणादायी आहे. म्हणूनच तो जपला पाहिजे .
त्या पुढे म्हणाल्या की , भूपालगड या ठिकाणी पर्यटन केंद्र व्हावे, गड किल्ले संवर्धनातून या गडाचा विकास व्हावा. या कामी शासनाने योग्य ती मदत करावी. ग्रामस्थ व युवावर्गाने लोक सहभागातून गडाची पुर्नबांधणी व पुर्नविकासासाठी हातभार लावावा . या भूमीत वाढलेल्या व नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींनी गडाकडे पहावे व गडाच्या प्रगतीसाठी आपली पावले गडाकडे वळवावीत.
यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष प्रा. सुनील दबडे म्हणाले की, सध्याची सामाजिक परिस्थिती धकाधकीची, गोंधळाची आणि असुरक्षित आहे. अशावेळी साहित्यिकांनी परखडपणे बोलणं आणि लिहीणं आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी आटपाडी तालुका साहित्य मंचातर्फे राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
संमेलनातील परिसंवाद रंगतदार झाला. यामध्ये प्रा.पी.सी.गायकवाड आणि साहेबराव चवरे यांनी ‘बहिर्जी नाईकांचे कार्य व कर्तृत्व’ या विषयावर अभासपूर्ण विचार मांडले. या सत्रातच ‘वाचनाची आवश्यकता आणि साहित्य’. या विषयावर आटपाडीचे डॉ.दिनेश देशमुख यांनी उपस्थितांना अभ्यासपूर्ण माहिती दिली.
रघुराज मेटकरी, प्रा.विश्वनाथ गायकवाड, डॉ.सयाजीराजे मोकाशी, सुभाष बापू पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
सुप्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यामध्ये स्वाती शिंदे -पवार, रघुराज मेटकरी, प्रा.विश्वनाथ गायकवाड, रमेश जावीर, सुनील दबडे, प्रा.श्रीकृष्ण पडळकर, शाहीर हारीभाऊ गळवे, शिवाजीराव बंडगर यांनी सहभाग घेतला. पोवाडे ऐतिहासिक व सामाजिक कवितांनी संमेलनाला रंगत आणली.
यावेळी कवी संमेलनाचे अध्यक्ष सुधाकर इनामदार म्हणाले की, अशी संमेलने आटपाडी व खानापूर तालुक्यातील गावांगावांतहोणे आवश्यक आहेत. इनामदार यांच्या गझल वाचनामुळे काव्यरसिक मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला रघुराज मेटकरी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. सर्व कवी, साहित्यिक व व्याख्याते यांचा पुष्प व बुक देवून संमेलन अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये सुप्रसिद्ध कथाकथनकार व नवनवीन शैक्षणिक प्रयोग करणारे जीवन सावंत, लघुपट लेखक दिग्दर्शक अभिनेता रविकिरण जावीर, समाधान जावीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी माणिकराव गायकवाड, निलेश गायकवाड, शिवभुषण गायकवाड, विठ्ठल गायकवाड, शिवाजी गायकवाड, बाजीराव गायकवाड, हणमंत गायकवाड, महेश जाधव, राजेश जाधव, अनिल पवार, माणिक बाबर, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, बा रायगड ग्रुप, बाणूरगडचे ग्रामस्थ तसेच आटपाडी व खानापूर व सांगोला तालुक्यातील कवी, साहित्यिक उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण पडळकर यांनी केले.