नेर्ली -खंबाळे रस्त्यावरील कॅनॉल वर अखेर संरक्षक भिंती ऐवजी लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम सुरु …. सरपंच राजाराम शिंदे सरकार शेवटी एक वर्षाने पाठपुराव्याला यश

Google search engine
Google search engine

नेर्ली -खंबाळे रस्त्यावरील कॅनॉल वर अखेर संरक्षक भिंती ऐवजी लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम सुरु …. सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार शेवटी एक वर्षाने पाठपुराव्याला यश

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

नेर्ली- खंबाळे रस्ता कॅनॉल पुलावरील संरक्षक भिंत 9 जुलै 2022 रोजी रात्री कोसळली होती,त्याची बातमी 15 जुलै 2022 पुढारी पेपरला आली होती, सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव व टेम्भू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्र 2 ओगलेवाडी ऑफिस ला कळवले होते, सलग 11 महिने पाठपुरावा चालू होता, तरीही संरक्षक भिंत दुरुस्त झाली नाही, शेवटी नेर्ली अपशिंगे, खंबाळे, कोतवडे या चार गावच्या ग्रामस्थांनी नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांना लक्ष घालून पाठपुरावा करण्याची विनंती केली होती , सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांनी 18 जून 2023 रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव व कार्यकारी अभियंता टेम्भू उपसा सिंचन प्रकल्प, उपविभाग क्र 2 ओगलेवाडी ता कराड जि सातारा यांना लेखी पत्राने कळवले, दहा महिन्यापासून माझ्यासह नागरिक पाठपुरावा करत आहेत हे निदर्शनास आणून दिले, याच्या बातम्या दिनांक 20 जून 2023 च्या पेपरला आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून,सदर ठिकाणी स्थळ पाहणी केली असता कॅनॉल वरील संरक्षक कठडे तुटलेले दिसून येत आहेत, तसेच वळणमार्ग असल्याने अपघात होऊ होणेची शक्यता नाकारता येत नाही असा अहवाल उपविभागीय अभियंता, टेम्भू उपसा सिंचन प्रकल्प, उपविभाग क्र 2 ओगलेवाडी यांना पाठवला, त्याची प्रत नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांना जा क्र साबाउकडे /513 दि 28-06-23 ने पाठवली आहे ,त्यानंतर यंत्रणा कामाला लागली अखेर नेर्ली – खंबाळे रस्ता कॅनॉल वर बसवण्याचे काम सुरु झाले आहे,लोखंडी रेलिंग ऐवजी राष्ट्रीय महामार्गांवर जसे स्टीलचे बसवतात तसे रेलिंग बसवले असते तर जादा वर्ष टिकले असते, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅनॉलच्या दोन्ही बाजूला धोक्याचा रेडीयम रिफ्लेक्टर बोर्ड लावले आहेत, अश्याप्रकारे कॅनॉल वरील रस्ता सुरक्षित होणार आहे, उशिरा का होईना संरक्षक रेलिंग बसवन्याचे काम सुरु झाले त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे