महाआंदोलनासाठी महाआक्रोश मेळावा शेगावात संपन्न

0
145
Google search engine
Google search engine

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक .आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक
यांचे संयुक्त विद्यमाने.

शेगांव:-अमरावती विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संयुक्त विभागीय मेळावा चे आज
दिनांक २७ ऑगस्ट २०२३ ला राधा लॉन, लालबाबा देवी मंदिरासमोर, अकोट रोड, शेगाव. येथे आयोजन करण्यात आले होते.

अन्यायकारक वेळापत्रक निकालाच्या निकषावरून वेतनवाढ बंद करणे काम नाही, वेतन नाही या शासन निर्णयाच्या विरोधात व इतर मागण्यांकरिता या विभागीय मेळावा चे आयोजन करण्यात आले होते

काय होत्या प्रमुख मागण्या….
* *प्रमुख मागण्या* :

श्रम शाळेला ११ ते ५ वेळापत्रक पूर्ववत लागू करणे .जुनी पेन्शन योजना लागू करणे. काम नाही वेतन नाही हा निर्णय रद्द करणे. खात्यातील रिक्त पदे तातडीने भरणे .विद्यमान रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे. नवीन आकृतीबंधानुसार कामाठी, शिपाई, सफाईगार हे मृत घोषित केलेले संवर्ग पुनरुज्जीवित करणे. शिक्षण कक्षाचे सेवाभरती मंजूर करणे. सर्व संवर्गातील रिक्त पदे व पदोन्नतीची पदे तातडीने भरणे. भविष्यात कंत्राटी व बाह्यस्त्रोताद्वारे केली नोकर भरती त्वरित बंद करणे. कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन देण्यात यावे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवेशोत्तर ताकारी परीक्षांचे दरवर्षी आयोजन करणे शिक्षकांना रजा रोखीकरण लागू करणे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्राचार्य पदोन्नती देणे .अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित नियुक्त्या त्वरित करणे शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट १०, २०, ३० भ देणे. शिक्षकांच्या घेतल्या जाण्याऱ्या क्षमता परीक्षेचा शासन निर्णय त्वरित रद्द करणे अन्न धान्य पुरवठा आयुक्त वरून करावा अनुदानित आश्रम शाळांच्या पहारेकऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार वेतन श्रेणी लागू करावी या व इतर मागण्यांसाठी विभागीय मेळावा शेगाव येथे आयोजित करण्यात आला होता याला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून संस्थापक अध्यक्ष विक्रमजी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.