बी. एस. देशमुख स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतिमंद विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन केले उत्साहात साजरे !

0
142

शेगाव :- रोकडीया नगर मधील बी. एस. देशमुख इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी काल बाळापुर रोडवरील श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयामधील मुलांनसोबत रक्षाबंधनाचा सन साजरा केला यावेळी बी. एस देशमुख स्कूल मधील विद्यार्थिनी तेथील मुलांना राख्या बांधल्या त्यानंतर तेथील सर्व मुलांना अल्पउपहार व मिठाई देण्यात आली. मुलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला यावेळी एक वेगळा प्रकारचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. त्यावेळी तेथे देशमुख स्कूलचे संचालक तथा प्राचार्य अंकुश देशमुख यांनी मुलांना भेटवस्तू देत संवाद साधला.मतिमंद स्कूल चे प्राचार्य मुंडे सर व चव्हाण सर तसेच इतर शिक्षक कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केले.