खेराडे वांगीत अज्ञातांनी जे.सी.बीच्या सहाय्याने तलाठी कार्यालय भिंत पाडली. नागरीकांचे आमरण उपोषण सुरूच, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची आंदोलन स्थळी भेट.

Google search engine
Google search engine
  • खेराडे वांगीत अज्ञातांनी जे.सी.बीच्या सहाय्याने तलाठी कार्यालय भिंत पाडली. नागरीकांचे आमरण उपोषण सुरूच, संग्रामसिंह देशमुख आंदोलन स्थळी भेट.
  • सांगली/कडेगांव न्युज:
  • खेराडे वांगी येथे अज्ञात लोकांनी तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी खेराडे वांगी गावातील नागरिकांनी व विकास दत्तात्रय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पासून तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.
    काल सकाळपासून जन आंदोलन करून आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे.
    सांगली जिल्हा षरीषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँक संचालक संग्रामसिंह देशमुख भाऊ, कडेगांव नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या, प्रकाश गढळे, चंद्रकांत पाटील,विकास सुर्यवंशी, आबासाहेब करांडे, संभाजी जाधव,आंदोलन स्थळी भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेवून भिंत पाडणाऱ्या लोकांना चौकशी होवून कारवाई करावी अशी मागणी तहसिलदार यांचेकडे केली आहे.

    उपोषणास सागर तानाजी हजारे, दत्तात्रेय नानासो सूर्यवंशी, संदीप रामचंद्र सूर्यवंशी, सुनील दत्तात्रेय सूर्यवंशी यांचे बेमुदत उपोषणास बसले आहेत.