कडेगांव ग्रामिण रूग्णालयात आयुष्यमान भव आरोग्य सेवा साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ..

Google search engine
Google search engine
  1. कडेगांव ग्रामिण रूग्णालयात आयुष्यमान भव आरोग्य सेवा साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचा शुभारंभ.

 

सगली/कडेगांव न्युज:

 

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आयुष्यमान भव ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी कडेगांव ग्रामिण रूग्णालयाने आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र व उपकेंद्र साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे ग्रामिण रूग्णालयाने रक्तदान घेऊन आयोजन केले . त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कडेगांव ग्रामिण रूग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.वैभव पत्की, डॉ.आत्तार यांनी केले.या साप्ताहिक मेळाव्याचा शुभारंभ कडेगांव पोलिस स्टेशनचे दबंग पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी डॉ.वैभव पत्की,डाॅ आत्तार, डॉ सुरेश पाटील,डाॅ पाटील यांचेसह माजी सरपंच विजय शिंदे,उपस्थीत होते. यावेळीकडेगांव येथील ग्रामिण रूग्णालयात आयुष्यमान भव या मोहिमेदरम्यान घेतलेल्या रक्तदान केलेल्या आप्पासाहेब चव्हाण, विनायक शिंदे,जितेंद्र वळीव इत्यादी रक्तदात्यांचा प्रमाण पत्र व हेल्मेट, सॅक, पाण्याचा जार यापैकी एक वस्तु बालाजी ब्लड सेंटर यांचेकडून भेट देऊन डॉ.वैभव पत्की यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून, ही योजना १ सप्टेंबर सुरू झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेमध्ये आयुष्यमान आपल्या दारी, आभा कार्ड नोंदणी व वितरण, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व विद्यालयातील शून्य ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहिती डॉ वैभव पत्की यांनी मार्गदर्शन करताना दिली .याप्रसंगी मेटकरी, विजय शिंदे, प्रल्हाद चव्हाण,रणजित भोसले,विनायक शिंदे,कालिदास देशपांडे, पत्रकार हेमंत व्यास यांच्या सह युवक व रूग्ण उपस्थित होते.आरोग्य सेवक सेविका पर्यवेक्षिका वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पत्की यांनी आभार मानले