एस टी परिवहन महामंडळाच्या वतीने कडेगांव व कडेपुर बस स्थानकाची व स्वच्छता गृहाची परिक्षण समितीने केली पहाणी..

Google search engine
Google search engine
  1. एस टी परिवहन महामंडळाच्या वतीने कडेगांव व कडेपुर बस स्थानकाची व स्वच्छता गृहाची परिक्षण समितीने केली पहाणी.

सांगली/कडेगांव न्युज:

 

 

 

 


कडेगांव व कडेपुर येथील एस टी बस स्थानकातील स्वच्छतेचे मुल्यमापन करण्यासाठी परिक्षण समिती आली होती या परिक्षण समितीने एस टी बस स्थानकापासून ते स्वच्छतागृहाची तपासणी केली यावेळी विटा आगार व्यवस्थापक विद्या कदम, कडेगांव वाहतुक नियंत्रक विकास पाटील, मिथुन देशमुख, कडेपुर वाहतुक नियंत्रक सुनिल पाटील उपस्थित होते. या सर्वेक्षणाची वर्गवारी स्वच्छ सुंदर बस स्थानक विभाग – अ वर्ग निम शहरी विभाग ब वर्ग, ग्रामिण विभाग क वर्ग या तीन विभागातील बस स्थानकात होणार आहे. यावेळी कडेपुर बस स्थानक वाहतुक नियंत्रक सुनिल पाटील व कडेगांव बस स्थानक वाहतुक नियंत्रक विकास पाटील यांनी परिक्षण समिती टिमचे पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळी बाळासाहेब यादव, विलास यादव, हिराजी पाटणकर, अनिकेत पवार याच्यासह ग्रामस्थ व प्रवाशी उपस्थित होते