अन्यथा गटाराच्या साठलेल्या पाण्यात उपोषणाला बसणार* : *पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख

*अन्यथा गटाराच्या साठलेल्या पाण्यात उपोषणाला बसणार* : *डी एस देशमुख

 

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

कडेगाव ते ओगलेवाडी महामार्ग मधील जाचक स्पिड ब्रेकर ची उंची कमी करावी, कराड ते विटा महामार्ग कडेला वृक्षारोपण करावे . सुरली घाटाचे काम महामार्गा प्रमाणे चार पदरी करावे, कडेगाव शहरातील महामार्ग कडेला महात्मा गांधी विद्यालय समोर दोन्ही बाजूची अपूर्ण नाल्याची कामे पूर्ण करावीत. या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याचा इशारा कडेगाव पलूस राष्ट्रवादी कांग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष व पाणी संघर्ष समिती समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख यांनी दिला आहे.
त्याबाबतीत निवेदन कडेगाव प्रांताधिकारी अजय शिंदे व महामार्ग अधिकारी यांना दिलेले आहे. 25 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी विद्यालय येथे नाल्याच्या साठलेल्या पाण्यात अथवा कडेगाव छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उपोषणाला बसणार अशी माहिती पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख व संयोजक अभिमन्यू वरूडे यांनी दिली. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी पोलीस अधिकारी बजरंग अडसूळ, नामदेव रासकर, तानाजी भोसले, सुरेश यादव ऊर्फ अण्णा, जीवन करकटे, माजी नगरसेवक नितीन शिंदे, शशिकांत रासकर, प्रविण करडे, अशोक शेटे, संभाजी रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.