Google search engine
Google search engine

कडेगांव येथील कर्तव्यदक्ष होमगार्ड यांच्या प्रामाणिकपणाचे घडले दर्शन

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

आजच्या धावपळीच्या जीवनातसुध्दा अनेकजण आपापले काम अतिशय प्रामाणिक पणे करत असतात. अशाच एका कर्तव्यदक्ष होमगार्ड च्या सतर्कतेमुळे प्रामाणिक पणाचे दर्शन घडले. एस टी बस स्थानक परिसरात होमगार्ड पथकाचे कडेगांव तालुका इंन्चार्ज सर्जेराव रूपनर व रमजान मुल्ला हे बंदोबस्त करण्यासाठी फीरत असताना चाळकेवाडी जिल्हा सातारा मोहन चाळके यांचा मोबाईल व पैसे सापडले. होमगार्ड सर्जेराव रूपनर व रमजान मुल्ला यांनी याबाबत कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना सांगितले त्यांनी सदर इसमाचा पत्ता शोधुन मोहन चाळके याला कडेगांव पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले व त्याचा पडलेल्या मोबाईलची व पैशाची खात्री करून त्याच्या ताब्यात दिला. होमगार्ड सर्जेराव रूपनर व रमजान मुल्ला यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.