प्रांताधिकारी कार्यालयात डी एस देशमुख यांच्या उपोषणा बाबत बैठक संपन्न!! बैठकीत विविध मागण्याबाबत ठोस निर्णयाची शक्यता*

Google search engine
Google search engine

*प्रांताधिकारी कार्यालयात डी एस देशमुख यांच्या उपोषणा बाबतीत बैठक

सांगली/कडेगाव न्यूज:-

: कराड विटा महामार्गा मधील विविध मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर पासून गटाराच्या पाण्यात उपोषण करण्याचा इशारा पाणी संघर्ष समिती प्रमुख डी एस देशमुख यांनी दिला होता.
त्या बाबतीत प्रांताधिकारी अजय शिंदे व महामार्ग वरिष्ठ अधिकारी प्रकाश शेडेकर तसेच कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलिस🚓 निरीक्षक जितेंद्र शहाणे सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती प्रमुख डी ऐस देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चर्चा झाली.
चर्चेत 25 तारखेच्या डी ऐस देशमुख यांच्या उपोषणा पूर्वी कडेगाव ते ओगलेवाडी महामार्ग मधील अनावश्यक जाचक स्पिड ब्रेकर काढून टाकण्यात येणार आहेत . कराड विटा महामार्ग कडेला झाडे लावणे याबाबत लवकरच नवीन टेंडर मंजुरी साठी पाठविण्यात येणार आहे. सुरली घाटाचे काम चार पदरी होण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तसेच कडेगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालय समोर हायवे कडेला दोन्ही बाजूला नाले बाबतीत योग्य नियोजन लवकरच सुरू करण्यात येणार आहे ही चर्चा झाली. ही कामे मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर महामार्ग अधिकारी प्रकाश शेडेकर यांचे कडून उचित कार्रवाई व योग्य ठोस लेखी आश्वासन मिळणार अथवा डी एस देशमुख महात्मा गांधी विद्यालय समोर दुर्गंधी युक्त साठलेल्या पाण्यात 25 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यु वरूडे, दिपक न्यायनीत, माजी पोलीस अधिकारी बजरंग अडसूळ, नामदेव रासकर तानाजी भोसले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी प्रविण करडे, जगदीश महाडिक, सोमनाथ पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते.