*बेलपुरा येथे आगेत खाक झालेल्या कुटुंबाला दिला आमदार रवी राणांनी मायेचा हात*

0
348
Google search engine
Google search engine

 

👉 *माहिती मिळताच सर्व दौरा रद्द करून आमदार राणा पोचले घटनास्थळी*

👉 *तात्काळ दहा हजार रुपयांची नगद रक्कम देऊन तर सर्व शासकीय यंत्रणांना दिले तात्काळ मदत करण्याचे आदेश*

अमरावती :-
दि. 20.10.23  बेलपुरा या भागात असणारे दुबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यामागचे कारण म्हणजे दुबेकर कुटुंब हे बेलपुरा येथील रहिवासी असून दुबेकर कुटुंबाचे परिस्थिती ही अतिशय हालाखीची , मोलमजुरी करून आपले कुटुंब चालविणारे पुष्पा बबन दुबेकर
बबन देविदास दुबेकर व त्यांचा मुलगा अलोक असा परिवार आहे

 

अशातच त्यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सर्व घर आगेत नष्ट झाले असता कुटुंबातील एका सदस्याने आमदार रवी राणा यांना भ्रमणधौरीवरून संपूर्ण माहिती दिली असता आमदार राणा हे आपल्या विकास कामाच्या दौऱ्यात व्यस्त असून सर्व दौरा रद्द करीत घटनास्थळी पोहोचले आमदार राणांना बघून घरातील महिला यांनी जोरजोराने रडण्याचा टोह दिला,आपल्या कुटुंबातील एका सदस्याला ज्याप्रमाणे सांगतो त्याचप्रमाणे आमदार राणांना सुद्धा त्यांनी आपली आपबीती पूर्ण परिस्थिती सांगितली आमदार राणा यांना गरिबांच्या परिस्थितीची जाणीव असून त्यांच्याकडून राहायला गेले नाही तर त्यांनी मायेचा हात फिरवत जागेवरच दहा हजार रुपये नगद रक्कम कुटुंबियांना दिली , त्याचबरोबर संपूर्ण अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून सर्व गोष्टींचा पंचनामा करून तात्काळ शासकीय मदत देण्याचे आदेश सुद्धा दिले ,राणांच्या या भूमिकेमुळे दुबेकर परिवार हळवे झाले एका गरीब कुटुंबाचे वेदना जाणून घेणाऱ्या एका गरीब कुटुंबातून आमदारकीपर्यंत पोचणाऱ्या रानांना बघून पुष्पा व बबन हे भारावून गेले पुष्पा ही उदरनिर्वाहासाठी घरोघरी जाऊन धुनीभांडी करतात बबनही हात मजुरी करतो अशा कुटुंबासाठी रानांनी तात्काळ मदत दिल्याने आणि अधिकाऱ्यांनाही चांगलं खडसावल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे.