सरपंच सेवा संघाच्या कडेगाव तालुका अध्यक्ष पदी नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांची निवड

Google search engine
Google search engine

सरपंच सेवा संघाच्या कडेगाव तालुका अध्यक्ष पदी नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच मा श्री राजाराम शिंदे सरकार यांची निवड

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रातील सरपंचांच्या नोंदणीकृत संघटनेची नुकतीच अहमदनगर येथे राज्य कार्यकारणीची बैठक झाली, या बैठकीत संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या, तालुक्यातील सरपंचांना संघटित करून तालुक्यात एक आदर्श निर्माण करण्यासाठी, सरपंचांच्या समस्या सोडवण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी कडेगाव तालुक्यातील नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच आणि सांगली जिल्हा भाजपा चे माजी उपाध्यक्ष मा श्री राजाराम शिंदे सरकार यांची ” सरपंच सेवा संघाच्या कडेगाव तालुका अध्यक्ष ” पदी निवड करण्यात आली आहे,या निवडीचे पत्र सरपंच सेवा संघांचे संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेते श्री बाबासाहेब पावसे पाटील यांनी दिले, प्रदेशाध्यक्ष मा श्री रोहित पवार,राज्य कार्याध्यक्ष मा श्री रवींद्र पावसे,राज्य संघटक मा श्री अमोल शेवाळे, सरपंच सेवा संघांचे सांगली जिल्हाध्यक्ष मा श्री भगवानदास केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यातील सर्व सरपंचांच्या अडचणी, पंचायत समिती, ग्रामपंचायत मध्ये शासन स्तरावरील येणाऱ्या समस्या सोडवण्याचे काम करा असे मा श्री बाबासाहेब पावसे पाटील म्हणाले तसेच त्यांनी सर्वाना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या