ग्रीन पॉवर कारखान्याचा पहिली उचल ३००६!  मागील हंगामाचे अधिकचे शंभर रुपये देण्याचा निर्णय !

0
522
Google search engine
Google search engine

ग्रीन पॉवर कारखान्याचा पहिली उचल ३००६!  मागील हंगामाचे अधिकचे शंभर रुपये देण्याचा निर्णय !

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूज कारखान्यात उसदराच्या चर्चेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत ३००६ पहिली उचल देण्याचे सर्वानुमते ठरले, संघटनेची ३०५० रुपये पहिले उचल द्यावी अशी मागणी होती त्यानंतर एका तासाच्या चर्चेअंती पहिल्या उचलीची रक्कम ठरली तसेच मागील हंगामातील अधिकचे शंभर रुपये देण्याचे आश्वासन यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

गोपूज कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत मुख्य प्रवर्तक संग्रामसिह देशमुख,संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव, प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव, मुख्य शेती अधिकारी आर. के पवार, मुख्य फायनान्स अधिकारी एच.व्ही पाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष दत्तात्रय घार्गे, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, श्रीकांत लावंड,सूर्यकांत भुजबळ, वैभव पाटील, अजय पाटील, सत्यवान मोहिते, संतोष तुपे, पांडुरंग सूर्यवंशी, जालिंदर जाधव,बंडा पाटील, गोपूज सोसायटीचे चेअरमन विनोद खराडे, नारायण घार्गे,महेश घार्गे , विजय खराडे, चेतन घार्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की शेतकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे या भावनेतून व शेतकऱ्यांच्या मागणीतून ग्रीन पॉवरची निर्मिती झाली आहे. चालू हंगामात ३००६ रुपये पहिली उचल दर देण्याचे आपल्या सर्वांच्या साथीने व साक्षीने देण्याचे कबूल करीत आहोत,व अंतिम दर शेतकरी संघटनेच्या सांगली येथील बैठकीनंतर जो ठरेल व साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी नाराज होणार नाहीत याची काळजी घेऊन दिला जाईल,आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखविला आहे तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले म्हणाले की, संग्राम सिंह देशमुख यांनी दाखविलेली शिष्टाई व शेतकऱ्यांच्या प्रति त्यांना असलेली आपुलकी यातून समनव्याने हा तोडगा निघाला आहे,तालुक्यातील तीनही कारखान्यानी शेतकऱ्यांना आज जो विश्वास दिला आहॆ, शेतकरीही व संघटना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांना सहकार्य करतील.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, तानाजी देशमुख दत्तात्रय घार्गे, वैभव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. जगदीश यादव यांनी आभार मानले.यावेळी खटाव तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.